उत्कृष्ट वाचक पुरस्काराने सुभाष भडभडे सन्मानित

रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयाचा उत्कृष्ट वाचक पुरस्कार सुभाष दत्तात्रय भडभडे यांना देण्यात आला.

वाचन चळवळ आणि साहित्य चळवळ वाढीस लागावी, या हेतून कार्यरत असणार्‍या येथील जनसेवा ग्रंथालयातर्फे सलग दुसर्‍या वर्षी वाचक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जनसेवा ग्रंथालयात वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक़्रमात श्री. भडभडे हा पुरस्कार देण्यात आला.

सुभाष भडभडे निवृत्त शिक्षक असून गेली कित्येक वर्षे ते जनसेवा ग्रंथालयाचे वाचक-सभासद आहेत. केवळ वाचन न करता संदर्भग्रंथांचा अभ्यास करून ते लेखनाकडे वळले आणि त्यांचे स्वत:चे ‘अंतरंग’ हे ललित लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले. नामवंत व्यक्तीसोबत पत्रव्यवहार करण्याचा त्यांना छंद असून आजपर्यंत साहित्य, समाज, राजकारण या क्षेत्रातील अनेक नामवंतांशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार संग्राह्य आहे. जनसेवा ग्रंथालयातील विविध उपक्रमात ते सातत्याने सहभागी असतात. शब्दांकुर या ग्रंथालयाच्या हस्तलिखितासाठीही ते वेळोवेळी लेखन करतात. वाचन आणि ग्रंथालयीन उपक्रमातील त्यांचा सहभाग लक्षात घेता निवड समितीने यावर्षीच्या उत्कृष्ट वाचक पुरस्कारासाठी त्यांचे नाव जाहीर केले.

जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांच्या हस्ते श्री. भडभडे यांना उत्कृष्ट वाचक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, ग्रंथालयाच्या परंपरेप्रमाणे पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी भडभडे यांना शुभेच्छा दिल्या. पुरस्कार निवड समिती प्रमुख अमोल पालये यांनी पुरस्कार निवड प्रक्रिया उलगडली.

या कार्यक्रमाला बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई, कार्यवाह ओंकार मुळे, उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी, निवृत्त शिक्षिका शैलजा लिमये, गंथपाल सौ. सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सुभाष भडभडे यांना उत्कृष्ट वाचक पुरस्काराने सन्मानित करताना अध्यक्ष प्रकाश दळवी, सोबत उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी, कार्यवाह ओंकार मुळे, डॉ. शरद प्रभुदेसाई, निवड समितीचे अमोल पालये

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply