मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याची माहिती संस्थाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली.
अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून १९४९ पासून सातत्याने कार्यरत असलेल्या या संघातर्फे १९७६ पासून राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षीची ४९ वी स्पर्धा होतील. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अंक म्हणून मनोरंजनकार का. र. मित्र स्मृती पुरस्कारासाठी “अवतरण सकाळ, मुंबई (संपादक -राहुल गडपाले) या अंकाची निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचा संपूर्ण निकाल असा – चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक – अक्षर, संपादक – मीना कर्णिक, मुंबई. पांडुरंग रा. भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक – वेदान्तश्री, संपादक सुनील उंब्रजकर, पुणे. पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक – सामना, संपादक संजय राऊत, मुंबई. पु. ल. देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – जत्रा , संपादक अभय कुलकर्णी, पुणे. साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट युवकांसाठी अंक – उद्याचा मराठवाडा, राम शेवडीकर, नांदेड. मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक – मनोरमा, संपादिका सौ. शोभा श्रीकांत मोरे, सोलापूर. कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक – द इनसाइट – संपादक, विनायक पाचलग, मुंबई.
संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्व विजया मनोहर कोळस्कर स्मृती अमृतप्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आलेले अंक असे – गोमंतक – संपादक राजू नायक, गोवा,
वारसा – जयंत येलूलकर, अहमदनगर, सर्जनशील तेचा नवाविष्कार – संपादक प्रा. डॉ. वर्षा खडसे रणदिवे, नवी मुंबई. हेमांगी – प्रकाश कुलकर्णी, मुंबई. ऋतुरंग – अरुण शेवते, मुंबई.
वाघूर – नामदेव कोळी, जळगाव. लोकशाही वार्ता – भास्कर लोंढे, नांदेड. अपेक्षा – दत्तात्रय उभे, पुणे. वसंत – दिलीप देशपांडे, मुंबई. प्रतिभा साहित्य वारी – नीलेश गायकवाड, ठाणे
सर्वोत्तम – अश्विन खरे, इंदूर. गुंफण – बसवेश्वर चेणगे, सातारा.
याशिवाय उत्कृष्ट अंक म्हणून आनंद तरंग- पराग पोतदार, पुणे, एकमेव वेगळा – प्रकाश पानसे, ठाणे, शब्द शिवार- इंद्रजित घुळे, मंगळवेढा, चंद्रकांत -नीलिमा कुलकर्णी, मुंबई, आर्याबाग- कल्याण तावरे, पुणे, शब्दसंवाद- नीलेश पवार, महाड, विनर्स – विनोद शिंदे, पुणे, शेतीप्रगती- रावसाहेब पुजारी, कोल्हापूर, जलोपासना – डॉ. दत्ता देशकर, पुणे, मुक्त संवाद- डॉ. विवेक कोरडे, मुंबई, ऋतुपर्ण- सुरेंद्र गोगटे, पुणे, युवावार्ता – किसन हासे, संगमनेर, पुरुष उवाच –डॉ. गीताली वि मं, पुणे या अंकांची निवड करण्यात आली आहे. उल्लेखनीय अंक म्हणून शब्दमल्हार – स्वानंद बेदरकर, नाशिक, सृजनसंवाद – गीतेश शिंदे, ठाणे, साहित्य सावाना – प्रा. अनंत येवलेकर, नाशिक, सृजनदीप- डॉ. आनंद कांबळे, हडपसर, तेजोमय- डॉ. दत्तात्रय शिंदे, पुणे, दुर्गांच्या देशातून – संदीप तापकीर, पुणे, अद्वैत – राजन चव्हाण, सिंधुदुर्ग, साहित्य संगम – उमाकांत वाघ, विरार, गावगाथा – धोंडप्पा नंदे, अक्कलकोट या अंकाची निवड झाली आहे.
परीक्षक म्हणून सुनील सुर्वे (ग्रंथालय प्रमुख – केळकर कॉलेज), दत्ता मालप (प्रत्युष जाहिरात कंपनीचे प्रमुख) यांनी काम पाहिले.
येत्या २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दादर सार्वजनिक वाचनालयाच्या धुरू हॉलमध्ये साजरा होणार आहे. त्यावेळी दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

