वेदमूर्ती आठल्ये गुरुजी आणि फडकेशास्त्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नागिरीत ११ मार्चपासून विशेष कार्यक्रम

रत्नागिरी : वेद आणि शास्त्र या विषयातील रत्नागिरी जिल्ह्यातील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वैदिक मार्तंड व वैदिक शिरोमणी वे. मू. कै. विनायक सीताराम आठल्ये गुरुजी आणि व्याकरणाचार्य कै. पु. ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन शुद्ध षष्ठी शके १९४५ (११ मार्च ते १५ मार्च २०२४) या कालावधीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे.

या कालावधीत दररोज सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा या वेळेत गोव्यातील घनपाठी न्यायचूडामणी वेदमूर्ती दत्तभार्गव गुलाब टेंग्से गुरुजी यांच्या वाणीतून ऋग्वेद संहिता पारायण होणार आहे. या कालावधीत दररोज सायंकाळी चार ते सहा ते सव्वासहा ते रात्री आठ या वेळेत कडावल येथील वेदमूर्ती सचिन भाटवडेकर गुरुजी यांचे ‘गुरुचरित्र’ या विषयावर निरूपण होणार आहे.

समारोपाच्या दिवशी, शुक्रवारी १५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता रत्नागिरीतील काव्यतीर्थ विनायकशास्त्री नारायण पोखरणकर गुरुजी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन आठल्ये गुरुजी आणि फडकेशास्त्री यांचे सर्व माजी विद्यार्थी आणि स्मृती समिती सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : प्रवीण मुळ्ये – 9960245342; भगवान जुवेकर – 9518959477

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply