वाटूळ : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील वाटूळ गावावर आधारित काव्य लघुपट नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. गावचे सुपुत्र विराज विलास चव्हाण यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून, त्याचे काव्यही त्यांनीच रचले आहे. हा लघुपट गावातील निसर्गसंपदा, समाजजीवन, संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडवतो.
रविवारी, १९ मे २०२४ रोजी आदर्श विद्यामंदिराच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. या वेळी वाटूळचे ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. या लघुपटाचे छायाचित्रण वाटूळ गावचे सुबोध वळंजू यांनी केले असून, संगीत प्रणय शेट्ये यांचे आहे. कवितेला आवाज अनिल सुतार यांनी दिला आहे. या लघुपटात वाटूळ गावचे तरुण कलाकार सूरज पांचाळ यांनी अभिनय केला असून, रत्नागिरीच्या आकांक्षा साळवी हिने नृत्य केले आहे.

संगीतकार प्रणय शेट्ये, अभिनेते अनिल सुतार, झाशीच्या राणीचे वंशज श्री. नेवाळकर, उद्योजक विश्वास विठ्ठल चव्हाण, वाटूळ प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कामत सर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक बाळकृष्ण मुरारी चव्हाण यांनी आपले विचार मांडून काव्य लघुपटाला शुभेच्छा दिल्या. लघुपट वाटूळ ग्रामस्थांना आवडला आणि त्यांनी दाद दिली. हा लघुपट गावासाठी मौल्यवान खजिना असून वाटूळ गावासाठी आणि त्याचा समृद्ध वारसा जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा लघुपट ग्रामस्थांना एकत्र आणण्यासाठी आणि गावच्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्यासाठी मदत करील. तसेच या लघुपटामुळे वाटूळ गावचे निसर्गसौंदर्य व पर्यटन जगभर पोहोचण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन काव्य लघुपटाचे कवी व दिग्दर्शक विराज चव्हाण यांनी केले. आपल्या मनोगतातून त्यांनी या लघुपटाचा प्रवास लोकांसमोर मांडला आणि ज्यांनी या लघुपटाला मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला ह. भ. प. बाळकृष्ण मुरारी चव्हाण, उद्योजक विश्वास विठ्ठल चव्हाण, वाटूळ प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कामत सर, अभिनेते अनिल सुतार, संगीतकार प्रणय शेट्ये, झाशीच्या राणीचे वंशज श्री. नेवाळकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सुरेश भाई चव्हाण, अॅडव्होकेट किशोर वळंजू, माजी सरपंच अभय चव्हाण, संतोष भुर्के, वा. मं. वि. सोसायटीचे चेअरमन कृष्णा चव्हाण, वाकेड गावचे सरपंच संदीप सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुहास चव्हाण, संतोष (बंधू) चव्हाण, वाटूळ ग्रामपंचायत सदस्य प्रशांत चव्हाण, ओमकार चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण, पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण वळंजू, उपाध्यक्षा वर्षा कृष्णा चव्हाण, पत्रकार प्रकाश वळंजू, ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत पांचाळ, ज्ञानदेव चव्हाण, तसेच गावातील युवक, महिला, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात निवेदन विजय हटकर यांनी केले. (लघुपटाची लिंक : https://youtu.be/a_W9i_Tr17o)



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

