गोळपच्या श्री रामदरबार प्रतिष्ठानतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

रत्नागिरी : गोळप (ता. रत्नागिरी) येथील श्री रामदरबार प्रतिष्ठानतर्फे आठवी अनंत रघुनाथ काळे स्मृती रत्नागिरी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

माझ्या जिल्ह्याचा विकास…. माझी दृष्टी, सामर्थ्य आहे चळवळीचे….., लोक काय म्हणतील?, माझी स्वप्न…. जी झोपू देत नाहीत.., कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन यापैकी कोणत्याही एका विषयावर भाषण करायचे आहे.

स्पर्धा फक्त एकाच खुल्या गटासाठी आहे आणि सगळ्यांसाठी खुली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी यामध्ये भाग घेऊ शकतो. वेळ मर्यादा कमीतकमी ५ ते जास्तीतजास्त ७ मिनिटे असेल. किमान वेळेपेक्षा भाषण कमी किंवा जास्त झाल्यास स्पर्धक बाद होईल. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १५००, १२०० आणि १००० रुपयांची बक्षिसे आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल. स्पर्धकांची संख्या जास्त असल्यास उत्तेजनार्थ प्रत्येकी ५०० रुपयांची दोन बक्षिसे दिली जातील.

स्पर्धा ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता पाटणकर कार्यालय, फिनोलेक्स फाटा, गोळप.
येथे सुरू होईल. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस समारंभ स्पर्धा संपल्यानंतर लगेच होईल.

इच्छुक स्पर्धकांनी अविनाश काळे (९४२२३७२२१२) यांच्याशी संपर्क करून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply