अभिजात मराठी भाषेबाबत लेख स्पर्धा

मुंबई : अमृततुल्य मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळणे हे सर्वच मराठीप्रेमींचे स्वप्न होते. ते आता साकार झाले आहे. त्यानिमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघाने त्याच विषयावरील लेख स्पर्धा आयोजित केली आहे.

मराठी वृत्तपत्र वृत्रपत्रलेखकांच्या चळवळीतील प्रमुख संस्था असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे २०२४ हे वर्ष अमृतमहोत्सवी सांगता वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने संघातर्फे गोरेगाव येथील मराठी विचारधारा प्रतिष्ठान, गेली बारा वर्षे अमेरिकेत मराठी संस्कृती, साहित्य जपण्याचा आणि संवर्धनाचा प्रयत्न करणाऱ्या मराठी कल्चर अँड फेस्टिवल्स संस्थेच्या अध्यक्षा ऐश्वर्या कोकाटे (लॉस एन्जेलिस) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी अभिजात भाषा चला ज्ञानभाषा करू या!’ या विषयावर राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे. देशपरदेशातील मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक, राजकारणी, कलावंत, खेळाडू, स्पर्धा परीक्षार्थी, शिक्षक-प्राध्यापक-विद्यार्थी यांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लेख मराठी युनिकोडमध्ये टायपिंग करून ओपन पाठवावा. मराठी भाषा संवर्धगासाठी आणि टिकविण्यासाठी आपण सामुदायिकरित्या काय प्रयत्न करू शकतो, यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणू शकतो हा लेखाचा मुख्य गाभा असावा. लेख chaval1949@gmail.com या ईमेलवर किंवा ९३२३११७७०४ या व्हॉट्स अॅपवर पाठवावे. त्याची नोंद सुनील कुवरे यांच्या मोबाइलवर द्यावी.

लेख पाठविण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून निकाल जानेवारी २०२५ च्या अखेरच्या आठवड्यात जाहीर होईल. पारितोषिक वितरण समारंभ २७ फेब्रुवारी कुसुमाग्रज जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी होईल.

माहिती पत्रकासह अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख सुनील कुवरे (९१६७३६४८७०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply