जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे ७, ८ जूनला डुप्लिकेट ब्रिज स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशन यावर्षी आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने रत्नागिरीत येत्या शनिवारी दि. ७ आणि रविवारी दि. ८ जून रोजी दिवंगत प्राचार्य डॉ. सुभाष देव स्मृतीप्रीत्यर्थ डुप्लिकेट ब्रिज स्पर्धा आयोजित केली आहे.

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने ही राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा साळवी स्टॉप येथील नक्षत्र हॉलमध्ये होणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन ७ जून रोजी दुपारी १२ वाजता श्रीमती सुखदा देव यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डुप्लिकेट ब्रिजच्या प्रत्येकी ८ बोर्डाच्या सहा फेऱ्या खेळवल्या जातील. यामधून चार किंवा सहा संघ गोल्डन ग्रुपसाठी पात्र होतील. दुसऱ्या दिवशी या पात्र संघांमध्ये ऑल टू प्ले ऑल या पद्धतीने सामने होऊन त्यातून क्रमांक निश्चित केले जातील. राहिलेले संघ पुन्हा लीग मॅच खेळतील व त्यांच्यातूनही तीन क्रमांक काढले जातील.

या स्पर्धेत मुंबई, गोवा, पुणे, बेळगाव, कोल्हापूर, राजापूर, देवगड, सावंतवाडी व यजमान रत्नागिरीमधील संघ भाग घेणार आहेत. एका संघात जास्तीत जास्त सहा खेळाडू असतात. या स्पर्धेसाठी एकूण सुमारे पन्नास हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे संचालक म्हणून दक्षिण दास आणि राजीव देव काम पाहणार आहेत.

ब्रिज हा जागतिक दर्जाचा पत्त्यांचा खेळ असून ऑलिंपिकमध्येही याचा समावेश करण्यात आला आहे. जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले आणि सचिव सचिन जोशी यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply