रत्नागिरी : दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. किनारपट्टीचा जिल्हा असल्याने सर्व समुद्रकिनाऱ्यांसह बंदरं, जेटी, संवेदनशील ठिकाणं, बाजारपेठा, रेल्वे आणि बसस्थानकं, धार्मिक स्थळं अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाणी, बॉम्ब शोध आणि नाशक पथक, तसंच श्वानपथक यांच्याद्वारे संशयास्पद वस्तू, वाहनं आणि व्यक्तींची तपासणी केली जात आहे. ग्रामस्थ, सागर रक्षक दल, सुरक्षा रक्षक यांच्या बैठका घेऊन संभाव्य धोक्यांबाबत माहिती देऊन दक्ष राहण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत. काहीही संशयास्पद आढळल्यास ११२ क्रमांकावर किंवा १०९३ या किनारी हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media





