रत्नागिरीत करोनाबाधितांची संख्या २०१ने वाढली; सिंधुदुर्गात १०१ रुग्ण वाढले

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (ता. ९) करोनाबाधितांची संख्या २०१ने वाढली असून, त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ५२६८ झाली आहे. सिंधुदुर्गात १०१ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या २०८६ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आज १३४ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत ३२६० जण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ६१.८८ टक्के आहे.

आज चिपळूणमध्ये तब्बल ६७ रुग्ण सापडले आहेत. तालुकानिहाय आकडेवारी अशी : रत्नागिरी ४९, खेड १५, गुहागर ३०, चिपळूण ६७, संगमेश्वर ३२, खेड १५, लांजा ४, राजापूर २, दापोली १, मंडणगड १.

आज दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १५३ झाली असून, मृतांचे प्रमाण २.९० टक्के आहे.

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सर्व क्षेत्रातील व्यक्तींना करोनाची बाधा होत आहे. जनतेच्या थेट संपर्कात येणारे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १६८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून सध्या ३३ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. आणखी ७१ कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून, ६४ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. ते पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (नऊ सप्टेंबर) आणखी १०१ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २०८६ झाली आहे. आतापर्यंत १०४९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १००६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप २०७ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३१ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८४६७ व्यक्ती विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार २६६ व्यक्ती आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply