रत्नागिरीत नवे १७५ करोनाबाधित रुग्ण; सिंधुदुर्गात ९९ रुग्णांची वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातर्फे जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आज (ता. १२) जिल्ह्यात नवे १७५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. चिपळूण तालुक्यात ६४, खेड तालुक्यात ४४, तर रत्नागिरी तालुक्यात ३१ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ५७६३ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९९ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या २३४८ एवढी झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीतील १३३ जण आज बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या एकूण संख्या ३५३० झाली असून हे प्रमाण ६१.२५ टक्के आहे.

आज दोघा करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १५९ झाली असून, हे प्रमाण २.७५ टक्के आहे.

आज जिल्ह्यात सापडलेल्या १७५ रुग्णांचे विवरण असे – आरटीपीसीआर – खेड ३१, गुहागर १०, चिपळूण १८, संगमेश्वर १५, रत्नागिरी १०, राजापूर ३. (एकूण ८७). रॅपीड अँटीजेन टेस्ट – खेड ४४, गुहागर १०, चिपळूण ६४, संगमेश्वर १६, रत्नागिरी ३१, लांजा ६, राजापूर ४. (एकूण ८८).

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१२ सप्टेंबर) आणखी ९९ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २३४८ झाली आहे. आतापर्यंत ११६८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ३१५ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८४८७ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात ४५३५ व्यक्ती आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply