रत्नागिरी जिल्ह्यात नव्या ७९ करोनाबाधितांची नोंद; सिंधुदुर्गात ५१ नवे बाधित

रत्नागिरी : आज नवे ७९ करोनाबाधित रत्नागिरी जिल्ह्यात आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६१४५ झाली आहे. सिंधुदुर्गात ५१ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या २५२० झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – खेड ११, गुहागर १, चिपळूण २, संगमेश्वर ३, रत्नागिरी ९, लांजा १ (एकूण २७). रॅपीड अँटिजेन टेस्ट – खेड १०, गुहागर ११, चिपळूण ११, संगमेश्वर २, रत्नागिरी १७, लांजा ४ (एकूण ५५).

१२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५७६३ होती. १३ सप्टेंबरला २२२, १४ सप्टेंबरला ८१, तर आज नवे ७९ रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ६१४५ झाली आहे.

आज सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १८२ झाली आहे. आज मरण पावलेल्यांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. त्यांचा तपशील असा – रत्नागिरी (वय ५५, पुरुष), चिपळूण (वय ६२, पुरुष), संगमेश्वर (वय ७०, पुरुष), रत्नागिरी (वय ८५, महिला), चिपळूण (वय ७३, महिला), खेड (वय ५९, महिला), खेड (वय ६८, पुरुष).

मुंबईसह अन्य जिल्ह्यांतून आल्याने ४६४७ जण गृह विलगीकरणात आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ सप्टेंबर) आणखी ५१ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २५२० झाली आहे. आतापर्यंत १४९१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ६३८ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८३४५ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ५६२ व्यक्ती आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply