रत्नागिरी : आज (१७ सप्टेंबर) १२० नवे करोनाबाधित रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज नवे १२० करोनाबाधित रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६४१७ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय आणि चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – मंडणगड ६, गुहागर ३, चिपळूण १२, संगमेश्वर १५, रत्नागिरी २२, राजापूर ५ (एकूण ६३). रॅपीड अँटिजेन टेस्ट – खेड १६, गुहागर ७, चिपळूण २०, संगमेश्वर १, रत्नागिरी ७. (एकूण ५७).
आज तीन पुरुष आणि तीन महिला अशा नव्या सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यांचा तपशील असा – चिपळूण, वय ७०, पुरुष. रत्नागिरी वय ७३, महिला. संगमेश्वर वय ६०, महिला. रत्नागिरी वय ८७, पुरुष. चिपळूण वय ८० महिला. दापोली वय ५२, पुरुष.
तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – मंडणगड २, खेड २८ दापोली २४, चिपळूण ४६, गुहागर ५, संगमेश्वर १७, रत्नागिरी ५७, लांजा ६, राजापूर ८. एकूण १९३. मृतांचे प्रमाण वाढून ३ टक्के झाले आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये ५२३ जण आहेत. आज १३९ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. बरे झालेल्यांचे हे प्रमाण ६४.९० टक्के झाले आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१७ सप्टेंबर) आणखी १६६ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २८८६ झाली आहे. आतापर्यंत १५३६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ६४१ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५४ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८६६० व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ६४६ व्यक्ती आहेत.


