रत्नागिरीत २६, तर सिंधुदुर्गात ३१ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ ऑक्टोबर) करोनाचे नवे २६ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ८०६५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३१ रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४४३५ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ ऑक्टोबर) आणखी ५० रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७२१५ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ८९.४६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे २६ रुग्ण आढळले. त्यापैकी १० आरटीपीसीआर चाचणीनुसार, तर १६ जण रॅपिड अँटिजेन टेस्टनंतर करोनाबाधित असल्याचे नक्की झाले. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – चिपळूण १, संगमेश्वर ५, रत्नागिरी ४. रॅपिड अँटिजेन टेस्ट – खेड, गुहागर, चिपळूण, राजापूर प्रत्येकी १, रत्नागिरी १२.

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८०६५ झाली आहे. बाधितांचा दर १५.६२ टक्के आहे. सध्या ४२४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. दापोलीतील ४५ वर्षांच्या एका महिलेचा १२ ऑक्टोबरला मृत्यू झाला होता. त्याची नोंद आज झाली. हा मृत्यू सरकारी रुग्णालयात झाला होता. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता २९६ झाली असून जिल्ह्याचा मृत्यूदर ३.६७ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ७९, खेड ४९, गुहागर ११, दापोली ३२, चिपळूण ७१, संगमश्वर ३०, लांजा १०, राजापूर १२, मंडणगड २.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१३ ऑक्टोबर) आणखी ३१ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४४३५ झाली आहे. आतापर्यंत ३५७१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ११५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. आज फोंडा (कणकवली) येथील एका ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या : देवगड ८, दोडामार्ग २, कणकवली २९, कुडाळ २०, मालवण ११, सावंतवाडी २८, वैभववाडी ७, वेंगुर्ला ९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

Fest Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply