रत्नागिरीत ९, तर सिंधुदुर्गात १५ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (तीन नोव्हेंबर) नऊ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३३ जण बरे झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १५ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, ३५ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (तीन नोव्हेंबर) ३३ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७९४७ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९३.७५ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – रत्नागिरी २ (एकूण २). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली ५, गुहागर १, लांजा १ (एकूण ७) (दोन्ही मिळून ९)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८४७६ झाली आहे. बाधितांचा दर १४.७३ टक्के आहे. सध्या १११ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एका मृत्यूची नोंद झाली. चिपळूणमधील ६९ वर्षांच्या पुरुषाचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत ३१७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७३ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८७, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७५, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (तीन नोव्हेंबर) १५ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४९५० झाली आहे. आज ३५ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ४३५३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply