करोनाचे रत्नागिरीत १६, तर सिंधुदुर्गात २० नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : करोनाचे आज (आठ जानेवारी) रत्नागिरी जिल्ह्यात १६, तर सिंधुदुर्गात २० नवे रुग्ण आढळले. रत्नागिरीत पाच जण, तर सिंधुदुर्गात १२ जण आज बरे झाले. दोन्ही जिल्ह्यांत आज एकेका रुग्णाचा मृत्यू झाला.

रत्नागिरीतील परिस्थिती
जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी, चिपळूणमध्ये प्रत्येकी १ आणि लांज्यात ४ रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरीत ४, तर खेड आणि संगमेश्वर येथे प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १६). एकूण रुग्णांची संख्या आता ९३०१ झाली आहे. आज आणखी १९४ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६१ हजार ३८६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज ५ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या ८८४८ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९५.१३ टक्के आहे.

राजापूर तालुक्यातील ६६ वर्षीय महिलेचा सात जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाली. आतापर्यंतच्या मृतांची एकूण संख्या ३३ झाली असून, मृत्युदर ३.५८ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (आठ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार १२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५५८६ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज २० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५९६४ एवढी झाली आहे. मु. पो. तरंदळे (ता. कणकवली) येथील ७० वर्षीय महिलेचा आज करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६१ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply