सिंधुदुर्गात करोनाचे १९७ रुग्ण, केवळ २७ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (११ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे १९७ रुग्ण आढळले, तर २७ जण करोनामुक्त झाले.

आजच्या १९७ रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ८ हजार १८४ झाली आहे. या रुग्णांचा आजपर्यंतचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ७५०, दोडामार्ग – ४१९, कणकवली – २३३०, कुडाळ – १७६७, मालवण – ८१६, सावंतवाडी – १०७२, वैभववाडी – ३१७, वेंगुर्ले ६६५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ४८.

आज २७ जण करोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची संख्या ६ हजार ८०९ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली असून आज ती एक हजार १७३ झाली आहे. सर्वाधिक २१८ सक्रिय रुग्ण देवगड तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – दोडामार्ग ४५, कणकवली २०८, कुडाळ २३०, मालवण १४९, सावंतवाडी १२६, वैभववाडी ९६, वेंगुर्ले ८५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १६.

आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १९६ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

आरटीपीसीआर तपासणीचा वेग वाढणार

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील रेण्वीय निदान प्रयोगशाळेत नवीन आरटीपीसीआर मशीन कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे आरटीपीसीआर तपासणीचा वेग वाढणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply