सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१३ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे विक्रमी ३१८ रुग्ण आढळले, तर अवघे ४२ जण करोनामुक्त झाले. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
आजच्या ३१८ रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ८ हजार ६७६ झाली आहे. या रुग्णांचा आजपर्यंतचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ८१९, दोडामार्ग – ४४८, कणकवली – २४१३, कुडाळ – १८७३, मालवण – ८६८, सावंतवाडी – ११२१, वैभववाडी – ३९७, वेंगुर्ले ६८७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५०.
आज ४२ जण करोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची संख्या ६ हजार ९०६ झाली आहे.
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली असून आज ती एक हजार ५६६ आहे. सर्वाधिक २८३ सक्रिय रुग्ण देवगड तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – दोडामार्ग ७३, कणकवली २५७, कुडाळ ३२६, मालवण १८८, सावंतवाडी १६२, वैभववाडी १७४, वेंगुर्ले ८५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १८.
आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १९८ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
