सिंधुदुर्गात करोनाचे १७४ रुग्ण, ५५ करोनामुक्त, दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे १५४ रुग्ण आढळले, तर ७८ जण करोनामुक्त झाले. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

आजच्या १५४ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ९ हजार ११० झाली आहे. या रुग्णांचा आजपर्यंतचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ८४७, दोडामार्ग – ४८४, कणकवली – २४८१, कुडाळ – १९४८, मालवण – ९१७, सावंतवाडी – ११८१, वैभववाडी – ४६७, वेंगुर्ले ७३२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५३.

आज ७८ जण करोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ हजार १२ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली असून आज ती एक हजार ८९१ आहे. सर्वाधिक २९७ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड २७०, दोडामार्ग १०७, कुडाळ ३९५, मालवण २३४, सावंतवाडी २१५, वैभववाडी २३८, वेंगुर्ले ११४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २१.

आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २०१ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply