सिंधुदुर्गात करोनाचे नवे १५२ रुग्ण, ५७ जण करोनामुक्त, पाच जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१९ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत घट झाली आहे. आज बाधा झालेले नवे १५२ रुग्ण आज आढळले, तर ५७ जण करोनामुक्त झाले. आज पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या १५२ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १० हजार ५९ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ९, दोडामार्ग – ८, कणकवली – २१, कुडाळ – ४४, मालवण – ७, सावंतवाडी – २६, वैभववाडी – ३०, वेंगुर्ले ७.

आज ५७ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७ हजार ३३३ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ४९९ आहे. सर्वाधिक ४४१ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३४०, दोडामार्ग १४५, कुडाळ ४३७, मालवण ३०७, सावंतवाडी ३१२, वैभववाडी ३२७, वेंगुर्ले १६६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २४.
सक्रिय रुग्णांपैकी ९७ रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. यापैकी ७८ रुग्ण ऑक्सिजनवर तर १९ रुग्ण व्हेंटिलेटर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यांचा तपशील असा – १) मु. पो. शिवाजीनगर, कुडाळ, ता. कुडाळ येथील ५७ वर्षीय पुरुष. त्याला किडनीविकार होता. २)
मु. पो. खारेपाटण, ता. कणकवली येथील ५४ वर्षीय पुरुष. त्याला रक्तविकार होता. ३) मु. पो. नेमळे, ता. सावंतवाडी येथील ८५ वर्षीय पुरुष. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ४) मु. पो. हरकुळ, ता. कणकवली येथील ८० वर्षीय पुरुष. त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार होता. ५) मु. पो. मालवण येथील ७२ वर्षीय महिला. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply