सिंधुदुर्गात प्रथमच एकाच दिवशी १५ करोनाबाधितांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२२ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे २३७ रुग्ण आढळले, तर ११० जण करोनामुक्त झाले. आज १५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. एकाच दिवशी मरण पावलेल्यांचा हा जिल्ह्यातील उच्चांक आहे.

आजच्या २३७ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १० हजार ७६३ झाली आहे.
आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३७, दोडामार्ग – १०, कणकवली – ७४, कुडाळ – २४, मालवण – ३९, सावंतवाडी – १५, वैभववाडी – २३, वेंगुर्ले ८. जिल्ह्याबाहेरील ७.

आज ११० जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७ हजार ६१९ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ८८९ आहे. सर्वाधिक ५५० सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ४२५, दोडामार्ग १७१, कुडाळ ४६१, मालवण ३३४, सावंतवाडी ३२२, वैभववाडी ४०१, वेंगुर्ले १९१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ३४. सक्रिय रुग्णांपैकी १७६ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी १५३ रुग्ण ऑक्सिजनवर तर २३ रुग्ण व्हेंटिलेटर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सक्रिय रुग्णांपैकी १७६ रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. यापैकी १५३ रुग्ण ऑक्सिजनवर तर २३ रुग्ण व्हेंटिलेटर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज १५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. करोनामुळे मरण पावलेल्या या बाधिताचा पत्ता, लिंग, वय, कारण आणि मृत्यूचे ठिकाण या क्रमाने मृतांचा तपशील असा – १) मु. पो. नेतर्डे, ता. सावंतवाडी, पुरुष, वय ६२ वर्षे. कारण – उच्च रक्तदाब, मृत्यूचे ठिकाण – जिल्हा रुग्णालय. २) मु. पो. किंजवडे, ता. देवगड, पुरुष, ४९, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ३) मु. पो. भिरवंडे, ता. कणकवली, पुरुष, ५९, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ४) मु. पो. कुणकवणे, ता. देवगड, पुरुष. ६५. उच्च रक्तदाब. जिल्हा रुग्णालय. ५) मु. पो. होडावडा, ता. वेंगुर्ले, पुरुष, ५२ उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ६) मु. पो. कांदळगाव, ता. मालवण, पुरुष, ५०, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. ७) मु. पो. कलमठ, ता. कणकवली, पुरुष, ५७, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. ८) मु. पो. वळिवंडे, ता. देवगड, महिला, ६६, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ९) मु. पो. वेंगुर्ले, महिला, ५५, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, जिल्ह रुग्णालय. १०) मु. पो. नेरूर, ता. कुडाळ, पुरुष, ७८, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. ११) मु. पो. कुडाळ, पुरुष, ४७, उच्च रक्तदाब, एसएसपीएम, पडवे. १२) मु. पो. सावंतवाडी, महिला, ५५, उच्च रक्तदाब, एसएसपीएम पडवे. १३) मु. पो. गिर्ये, ता. देवगड, महिला, ७५, उच्च रक्तदाब, एसएसपीएम, पडवे. १४) मु. पो. नेरूर, ता. कुडाळ, पुरुष, ६५, उच्च रक्तदाब, एसएसपीएम, पडवे. १५) मु. पो. माळगाव, ता. मालवण, महिला, ५५, मधुमेह, एसएसपीएम, पडवे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply