रत्नागिरी जिल्ह्यात नवे ४८२ करोनाबाधित, मृतांचा आकडा पाचशेच्या वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांची संख्या आज दुसऱ्या दिवशीही पाचशेच्या खाली असून आज (२२ एप्रिल) ४८२ नवे बाधित आढळले, तर आज १५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृतांची संख्या आता पाचशेच्या वर गेली आहे.

आज लांजा वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक १५० रुग्ण संगमेश्वर तालुक्यात होते.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ३७, दापोली ३, खेड २६, गुहागर ३८, चिपळूण १३, संगमेश्वर १६, राजापूर ८. (एकूण १४१). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ९७, दापोली ११, खेड १०, गुहागर ६, चिपळूण ६३, संगमेश्वर १३४, मंडणगड ४, राजापूर १६. (एकूण ३४१) (दोन्ही मिळून ४८२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १७ हजार ५३३ झाली आहे.

जिल्ह्यात आज १५ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यात २१ आणि २२ एप्रिल या कालावधीत मरण पावलेल्यांचा समावेश आहे. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत, तर दोघांचा खासगी रुग्णालयात झाला. मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी – ४ (३ पुरुष, १ महिला), खेड – १ (पुरुष), संगमेश्वर – ७ (पाच पुरुष, दोन महिला), चिपळूण – १ (महिला), राजापूर – १ (पुरुष), गुहागर – १ (पुरुष). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ५०३ झाली असून मृत्युदर २.८६ टक्के आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply