सिंधुदुर्गात नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे. करोनाची बाधा झालेले नवे १३१ रुग्ण आढळले, तर १८० जण करोनामुक्त झाले. आज ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या १३१ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १० हजार ८९४ झाली आहे.
आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४, दोडामार्ग – ९, कणकवली – २१, कुडाळ – १६, मालवण – ४०, सावंतवाडी – ९, वैभववाडी – ११, वेंगुर्ले १२. जिल्ह्याबाहेरील ७.

आज १८० जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७ हजार ७७९ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ८३२ आहे. सर्वाधिक ५५२ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३९७, दोडामार्ग १६३, कुडाळ ४७०, मालवण ३६२, सावंतवाडी ३०४, वैभववाडी ३५४, वेंगुर्ले १८८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ४२. सक्रिय रुग्णांपैकी १५८ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी १३१ रुग्ण ऑक्सिजनवर तर २७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. करोनामुळे मरण पावलेल्या या बाधिताचा पत्ता, लिंग, वय, कारण आणि मृत्यूचे ठिकाण या क्रमाने मृतांचा तपशील असा – १) मु. पो. शिवडाव, ता. कणकवली, पुरुष, ६३, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. २) मु. पो. बांधकरवाडी, ता. कणकवली, महिला, ७९, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ३) मु. पो. शिवडाव, ता. कणकवली, पुरुष, ६८, उच्च रक्दाब, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. ४) मु. पो. किंजवडे, ता. देवगड, पुरुष, ६४, किडनी विकार, जिल्हा रुग्णालय. ५) मु. पो. कांबळेगल्ली, ता. कणकवली, पुरुष, ४९. मधुमेह, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ६) मु. पो. साटेली, ता. दोडामार्ग, पुरुष, २८, रक्तविकार, जिल्हा रुग्णालय. ७) मु. पो. जामसंडे, ता. देवगड, पुरुष, ५७, मधुमेह, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ८) मु. पो. निरवडे, ता. सावंतवाडी, पुरुष, ६९, मधुमेह, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply