सिंधुदुर्गात नवे २३९ करोनाबाधित, २५ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२५ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे २३९ रुग्ण आढळले, तर २५ जण करोनामुक्त झाले. आज चौघांचा मृत्यू नोंदविला गेला.

आजच्या २३९ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ११ हजार ४२६ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १९, दोडामार्ग – ५, कणकवली – ६०, कुडाळ – १२, मालवण – ३७, सावंतवाडी – ३५, वैभववाडी – ५९, वेंगुर्ले ९. जिल्ह्याबाहेरील ३.

आज २५ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८ हजार ५९ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या तीन हजार ९४ आहे. सर्वाधिक ६३४ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३९६, दोडामार्ग १४६, कुडाळ ४८८, मालवण ४१६, सावंतवाडी ३७४, वैभववाडी ३९३, वेंगुर्ले १९९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ४८. सक्रिय रुग्णांपैकी १९० रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी १५७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. करोनामुळे मरण पावलेल्या या बाधिताचा पत्ता, लिंग, वय, कारण आणि मृत्यूचे ठिकाण या क्रमाने मृतांचा तपशील असा – १) मु. पो. शिरगाव, ता. देवगड, महिला, ६५, हृदय रोग, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. २) मु. पो. सावडाव, ता. कणकवली, महिला, ५५, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ३) मु. पो. नाधवडे, ता. वैभववाडी, पुरुष, ५०, उच्च रक्तदाब, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. ४) मु. पो. मालवण, पुरुष, ५०, उच्च रक्तदाब, मधुमेह, जिल्हा रुग्णालय.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply