सिंधुदुर्गात बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज (२७ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ३४४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर नवे २६२ रुग्ण आढळले. आज १२ जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी ठरली.

आज एकाच दिवशी ३४४ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८ हजार ७८७ झाली आहे.

आजच्या २६२ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ११ हजार ८८५ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३०, दोडामार्ग – १७, कणकवली – ६५, कुडाळ – ३३, मालवण – ४२, सावंतवाडी – ३६, वैभववाडी – १५, वेंगुर्ले १८, जिल्ह्याबाहेरील ६.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ८०० आहे. सर्वाधिक ५८३ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३१६, दोडामार्ग ११४, कुडाळ ३७६, मालवण ४२४, सावंतवाडी ३४८, वैभववाडी ३९५, वेंगुर्ले १८८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ५७. सक्रिय रुग्णांपैकी २१० रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी १७४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २९२ झाली आहे. करोनामुळे आज मरण पावलेल्या या बाधिताचा पत्ता, लिंग, वय, कारण आणि मृत्यूचे ठिकाण या क्रमाने मृतांचा तपशील असा – १) मु. पो. वैभववाडी, ता. वैभववाडी, पुरुष, ५५, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. २) मु. पो. देवगड, महिला, ७२, मधुमेह, एस.एस.पी.एम., पडवे. ३) मु. पो. कणकवली, महिला, ७५, मधुमेह, एस.एस.पी.एम., पडवे. ४) मु. पो. आचरा, ता. मालवण, महिला, ६०, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ५) मु. पो. गवंडीवाडा, ता. मालवण, पुरुष, ६६, उच्च रक्तदाब, पॉलिटेक्निक सीसीसी, मालवण. ६) मु. पो. कुसुर, ता. वैभववाडी, पुरुष, ५०, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ७) मु. पो. कुसुर, ता. वैभववाडी, पुरुष, ७०, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ८) मु. पो. तळेबाजार, ता. देवगड, महिला, ६२, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ९) मु. पो. सोनाळी, ता. वैभववाडी, पुरुष, ६३, उच्च रक्तदाब, सांगुळवाडी सीसीसी, वैभववाडी. १०) मु. पो. खवणे, ता. वेंगुर्ले, महिला, २९, प्रसूतिपश्चात जिल्हा रुग्णालय. ११) मु. पो. कोलगाव, ता. सावंतवाडी, पुरुष, ६६, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. १२) मु. पो. भटवाडी, ता. वेंगुर्ले, पुरुष, ७५, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply