रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ एप्रिल) नव्या करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ झाली. आज नवे ६६२ रुग्ण आढळले. आज ४९७ जण करोनामुक्त झाले, तर ११ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.
जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी मंडणगड तालुक्यात एकही करोनाबाधित आढळला नाही. इतर तालुक्यांमध्ये सर्वाधिक १५३ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.
जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ९०, दापोली ४०, खेड ३३, चिपळूण ४१, संगमेश्वर ३४, लांजा २०, राजापूर २४. (एकूण ३२५). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ६३, दापोली २२, खेड २३, गुहागर ४३, चिपळूण ५३, संगमेश्वर ४७, लांजा १४ आणि राजापूर २६. (एकूण ३३७). (दोन्ही मिळून ६६२).
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २० हजार २७८ झाली आहे.
जिल्ह्यात आज ४९७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १३ हजार ६५९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज ६७.३५ टक्के झाला आहे.
आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी एक हजार ११३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण एक लाख २३ हजार ३८५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आज पूर्वीचे १ आणि आजचे ११ अशा एकूण ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ६०६ झाली असून मृत्युदर २.९८ टक्के आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण मृत्यू असे – रत्नागिरी १४८, खेड ८०, गुहागर २४, दापोली ६२, चिपळूण १२५, संगमेश्वर ९३, लांजा २९, राजापूर ३९, मंडणगड ६.

