सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२८ एप्रिल) नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या तिपटीहून अधिक आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ५४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर नवे १४६ रुग्ण आढळले. आज १५ जणांच्या मृत्यूची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली.
आज एकाच दिवशी ५४५ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ९ हजार ३३२ झाली आहे.
आजच्या १४६ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १२ हजार २७ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १०, दोडामार्ग – ५, कणकवली – २३, कुडाळ – ४३, मालवण – ३३, सावंतवाडी – १२, वैभववाडी – ५, वेंगुर्ले १०, जिल्ह्याबाहेरील १.
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ३८२ आहे. सर्वाधिक ४६४ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड २८१, दोडामार्ग ११३, कुडाळ ३३७, मालवण ३७९४, सावंतवाडी २९८, वैभववाडी २९८, वेंगुर्ले १६४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ४८. सक्रिय रुग्णांपैकी २०१ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी १७० रुग्ण ऑक्सिजनवर तर ३१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आज १५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३०७ झाली आहे. करोनामुळे आज मरण पावलेल्या या बाधिताचा पत्ता, लिंग, वय, कारण आणि मृत्यूचे ठिकाण या क्रमाने मृतांचा तपशील असा – १) मु. पो. हळवल, ता. कणकवली, पुरुष, ७५, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. २) मु. पो. मधलीवाडी, ता. कणकवली, महिला, ७९, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ३) मु. पो. तेली आळी, ता. कणकवली, महिला, ४३, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. ४) मु. पो. आंबेरी, ता. मालवण, पुरुष, ३०, रक्तविकार, जिल्हा रुग्णालय. ५) मु. पो. कळणे, ता. दोडामार्ग, महिला, ३५, रक्तविकार, जिल्हा रुग्णालय. ६) मु. पो. पाट, ता. कुडाळ, पुरुष, ३५, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ७) मु. पो. काळसे, ता. मालवण, पुरुष, ५१, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ८) मु. पो. पिंगुळी, ता. कुडाळ, महिला, ७८, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ९) मु. पो. कणकवली, ता. कणकवली, पुरुष, ५४, उच्च रक्तदाब, एस.एस.पी.एम. पडवे. १०) मु. पो. तळेबाजार, ता. देवगड, महिला, ५०, उच्च रक्तदाब, सीसीसी, जामसंडे. ११) मु. पो. जुना बाजार, ता. सावंतवाडी, पुरुष, ८१, उच्च रक्तदाब, मधुमेह,
उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी. १२) मु. पो. नावळे, ता. वैभववाडी, पुरुष, ५०, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. १३) मु. पो. पाट, ता. वेंगुर्ले, पुरुष, ७२, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. १४) मु. पो. ओटवणे, ता. सावंतवाडी, पुरुष, ५०, उच्च रक्तदाब, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. १५) मु. पो. चिंचवली, ता. कणकवली, पुरुष, ६२, उच्च रक्तदाब, एस.एस.पी.एम. पडवे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड