रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांची आठशेच्या घरात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ एप्रिल) नव्या करोनाबाधितांची संख्या आठशेच्या घरात पोहोचली. आज नवे ७९१ रुग्ण आढळले. आज २०४ जण करोनामुक्त झाले, तर १३ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्यात आज सर्व तालुक्यांमध्ये करोनाबाधित आढळले. सर्वाधिक २३७ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.

जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १९६, दापोली १९, खेड ७९, गुहागर ६२, चिपळूण १२७, संगमेश्वर ४३, लांजा ४९, राजापूर २४. (एकूण ६०१). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ४१, दापोली १९, खेड ३०, गुहागर ६२, चिपळूण ६२, लांजा ५ आणि राजापूर १५. (एकूण ३३७). (दोन्ही मिळून ७९१). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २१ हजार ६९ झाली आहे.

जिल्ह्यात आज २०४ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १३ हजार ८६३ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज ६५.७९ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी एक हजार ७०७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण एक लाख २५ हजार ९२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे २ आणि आजचे ११ अशा एकूण १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ६१९ झाली असून मृत्युदर २.९३ टक्के आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण मृत्यू असे – रत्नागिरी १५२, खेड ८१, गुहागर २५, दापोली ६३, चिपळूण १२७, संगमेश्वर ९३, लांजा २९, राजापूर ४३, मंडणगड ६.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply