सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ४४२ करोनाबाधित रुग्ण, १० जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत नवे ४४२ करोनाबाधित रुग्ण आढळले. आज १० जणांचा मृत्यू नोंदविला गेला. आज १५२ रुग्ण करोनामुक्त झाले.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात दोन हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या ४४२ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १३ हजार ४५७ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ५०, दोडामार्ग – २८, कणकवली – ६०, कुडाळ – १०९, मालवण – ५८, सावंतवाडी – ५१, वैभववाडी – ११, वेंगुर्ले ७२, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यात सर्वाधिक ५५४ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात, तर त्याखालोखाल कुडाळ तालुक्यात ५५३ रुग्ण आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३२४, दोडामार्ग १५३, मालवण ४५६, सावंतवाडी ३३१, वैभववाडी १९७, वेंगुर्ले २५३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १०२. सक्रिय रुग्णांपैकी ३११ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २७२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३४७ झाली आहे. आज सर्वाधिक ४ कुडाळ तालुक्यातील रुग्णांचा मृत्यू झाला. कणकवलीतील २, तर देवगड, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू आज नोंदविला गेला. जिल्ह्यातील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ३५, दोडामार्ग – ९, कणकवली – ८५, कुडाळ – ५५, मालवण – ४३, सावंतवाडी – ६१, वैभववाडी – ३४, वेंगुर्ले – २३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply