सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे ५२३ करोनाबाधित आढळले, तर ३६७ रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी गेले.
दुसऱ्यांदा केलेल्या तपासणीनुसार ७ जणांसह जिल्ह्यात आज एकूण ५२३ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २४ हजार २९९ झाली आहे.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६३, दोडामार्ग – ५८, कणकवली – ८०, कुडाळ – १०३, मालवण – ९४, सावंतवाडी – ८४, वैभववाडी – १८, वेंगुर्ले – १६.
सध्या जिल्ह्यात ४ हजार ७७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ५२२, दोडामार्ग ४१४, कणकवली ७४३, कुडाळ १००५, मालवण ८६९, सावंतवाडी ७०५, वैभववाडी १९०, वेंगुर्ले ३१०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १५. सक्रिय रुग्णांपैकी ३९० रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी ३३४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात आधीचा १ आणि आजच्या १० जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६३९ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड ४, सावंतवाडी १, कुडाळ १, मालवण ३, वेंगुर्ले १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या तालुकानिहाय मृत्यूची एकूण संख्या अशी – देवगड ८३, दोडामार्ग – १८, कणकवली – १३३, कुडाळ – ९३, मालवण – १००, सावंतवाडी – १०८, वैभववाडी – ४६, वेंगुर्ले – ५६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.
आजपर्यंत एकूण १८ हजार ८८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात चार हजार ७७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
