रत्नागिरीत करोनाचे नवे ४३७ रुग्ण, ४८६ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ मे) करोनाचे नवे ४३७ रुग्ण आढळले, तर ४८६ जण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १०१, दापोली २, चिपळूण २९, संगमेश्वर ४५, लांजा ३२ आणि राजापूर २८ (एकूण २३७) रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत ५७, चिपळूण १. (एकूण ५८.) (दोन्ही मिळून २९५). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण १४२. (सर्व मिळून ४३७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३४ हजार ६२६ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून तीन हजार ३५६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ३७३ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ६२ हजार ३०३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४८६ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३० हजार १२१ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८६.९८ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार १४९ झाली आहे. मृत्युदर ३.३१ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३३४, खेड १२०, गुहागर ६२, दापोली १०१, चिपळूण २२९, संगमेश्वर १४७, लांजा ६३, राजापूर ८१, मंडणगड १२. (एकूण ११४९).

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply