रत्नागिरीत बाधितांपेक्षा करोनामुक्तांचे प्रमाण कमीच

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ मे) करोनाचे नवे ४१६ रुग्ण आढळले, तर ३७९ जण करोनामुक्त झाले. नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण आजही कमीच आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ९४, गुहागर १२, चिपळूण ३२, संगमेश्वर १८, लांजा ७ आणि राजापूर ११. (एकूण १७४). आरटीपीसीआर माय लॅब डिस्कव्हरी सोल्यूशन – १६ (दोन्ही मिळून १९०). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ४, दापोली आणि चिपळूण प्रत्येकी १. (एकूण २.) (तिन्ही मिळून १९६). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण २२०. (सर्व मिळून ४१६). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३५ हजार ४२ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून तीन हजार ३७३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ५०६ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ६३ हजार ८०९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ३७९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३० हजार ५०० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८७.०३ टक्के आहे.

जिल्ह्यात आज ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार १६९ झाली आहे. मृत्युदर ३.३३ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३४२, खेड १२२, गुहागर ६४, दापोली १०३, चिपळूण २३१, संगमेश्वर १४९, लांजा ६३, राजापूर ८३, मंडणगड १२. (एकूण ११६९).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply