सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २९ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे ५७५ करोनाबाधित आढळले, तर १२१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी गेले, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
दुसऱ्यांदा केलेल्या तपासणीनुसार ११ जणांसह जिल्ह्यात आज एकूण ५७५ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २५ हजार २६९ झाली आहे.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ११६, दोडामार्ग – २९, कणकवली – ११३, कुडाळ – १०२, मालवण – ६४, सावंतवाडी – ८१, वैभववाडी – १६, वेंगुर्ले – ४२, जिल्ह्याबाहेरील १.
सध्या जिल्ह्यात ४ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ५७५, दोडामार्ग २९७, कणकवली ७८८, कुडाळ १११७, मालवण ८०३, सावंतवाडी ७२७, वैभववाडी १९६, वेंगुर्ले ३२१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १४. सक्रिय रुग्णांपैकी ३६१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात आधीचा ७ आणि आजच्या ५ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६६३ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड १, कणकवली ४, कुडाळ २, मालवण ३, सावंतवाडी १, वेंगुर्ले १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या तालुकानिहाय मृत्यूची एकूण संख्या अशी – देवगड ८७, दोडामार्ग – १९, कणकवली – १३९, कुडाळ – ९६, मालवण – १०४, सावंतवाडी – ११२, वैभववाडी – ४६, वेंगुर्ले – ५८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
आज बरे होऊन गेलेल्या १२१ रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ७६२ जण करोनामुक्त झाले आहेत.
Follow Kokan Media on Social Media

