रत्नागिरीत ४९४ नवे बाधित, ४०२ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२९ मे) करोनाचे नवे ४९४ रुग्ण आढळले, तर ४०२ जण करोनामुक्त झाले. नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण आजही कमीच आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार २६६, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २२८ (दोन्ही मिळून ४९४).
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३५ हजार ५३६ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून तीन हजार ४४४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ९११ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार ७२० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४०२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३० हजार ९०२ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८६.९५ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार १९० झाली आहे. मृत्युदर ३.३४ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३४७, खेड १२२, गुहागर ६६, दापोली १०५, चिपळूण २३८, संगमेश्वर १५१, लांजा ६५, राजापूर ८४, मंडणगड १२. (एकूण ११९०).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply