रत्नागिरीत करोनामुक्तांची संख्या ३० हजाराच्या वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३० मे) करोनाचे नवे ५०८ रुग्ण आढळले, तर ३७८ जण करोनामुक्त झाले. नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण आजही कमीच आहे. जिल्ह्यातील करोनाममुक्तांची संख्या ३० हजाराच्या वर गेली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार २९६, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २१२ (दोन्ही मिळून ५०८).
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३६ हजार ४४ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून तीन हजार ५४७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ९७४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार ६९४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ३७८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३१ हजार २८० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८६.७८ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक ८ मृत्यू रत्नागिरी तालुक्यातील, दापोली आणि राजापूर तालुक्यातील प्रत्येकी २, तर खेड आणि संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू आज नोंदविला गेला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार २१७ झाली आहे. मृत्युदर ३.३७ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३५६, खेड १२३, गुहागर ७८, दापोली १०७, चिपळूण २३८, संगमेश्वर १५२, लांजा ६५, राजापूर ८६, मंडणगड १२. (एकूण १२१७).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply