सिंधुदुर्गात ८२३ रुग्ण करोनामुक्त, परदेशी जाणाऱ्यांसाठी शुक्रवारपासून लसीकरण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, १० जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ६३१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर ८२३ जण करोनामुक्त झाले. दरम्यान, परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, ११ जूनपासून करोनाप्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ७१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज नऊ जणांच्या दुबार तपासणीसह ६३१ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ७१, दोडामार्ग – १३, कणकवली – १३०, कुडाळ – १३४, मालवण – १३१, सावंतवाडी – ९०, वैभववाडी – १७, वेंगुर्ले – ३६.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ९१५, दोडामार्ग २४२, कणकवली १११२, कुडाळ १४१७, मालवण १३०६, सावंतवाडी ८२५, वैभववाडी २९८, वेंगुर्ले ५७७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २५. सक्रिय रुग्णांपैकी ३३० रुग्ण ऑक्सिजनवर तर ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात आजच्या १२ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ८२० झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड ४, कणकवली ५, कुडाळ ४, मालवण ३, जिल्ह्याबाहेरील ४.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड ११४, दोडामार्ग – २५, कणकवली – १६८, कुडाळ – १२७, मालवण – १३४, सावंतवाडी – १२८, वैभववाडी – ५५, वेंगुर्ले – ६५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ४.
……….
शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून लसीकरण

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे उद्या, ११ जूनपासून जिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आवर्जून याचा लाभ घ्यावा आणि लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लसीकरणाच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी याबाबत माहिती घेऊन निर्देश दिले. बैठकीला खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी उच्च शिक्षणाकरिता परदेशात जाऊ इच्छित असतील, त्यांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत आरोग्य विभागाला दिले.

अशा लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी, जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा, पासपोर्ट, व्हिसा, संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले १-२० किंवा डीएस-६० अर्ज, परदेशात उच्च शिक्षणाकरिता निवड झाल्याचे प्रमाणपत्र/नियुक्तीपत्र याबाबतची माहिती संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांनी पाठवायची आहे. विद्यार्थ्यांनीही याबाबत संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे संपर्क करावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply