रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१० जून) करोनाचे नवे ५३८ रुग्ण आढळले, तर ३७५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. आज १७ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ३३९, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १९९ (दोन्ही मिळून ५३८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४२ हजार २५९ झाली आहे. बाधितांचा जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर १७.६३ टक्के आहे.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ६९४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज तीन हजार १५३ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ९९ हजार ३३५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ३७५ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३६ हजार १२० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८५.४७ टक्के आहे.
जिल्ह्यात पूर्वीच्या ५ आणि आजच्या १२ अशा १७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ४४५ झाली आहे. मृत्युदर ३.४१ टक्के झाला आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४२५, खेड १३७, गुहागर ११४, दापोली १२२, चिपळूण २८२, संगमेश्वर १६९, लांजा ७९, राजापूर १०५, मंडणगड १२. (एकूण १४४५).

