सिंधुदुर्गात ८५९ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, १६ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ८५९ रुग्ण करोनामुक्त झाले, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ६ हजार २४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ७ जणांच्या दुबार तपासणीसह ४७९ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४६, दोडामार्ग – १३, कणकवली – ६३, कुडाळ – १०५, मालवण – ४५, सावंतवाडी – ८७, वैभववाडी – ३१, वेंगुर्ले – ८१, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ८०९, दोडामार्ग २०७, कणकवली १०८५, कुडाळ १२४२, मालवण ११४८, सावंतवाडी ७७९, वैभववाडी ३०५, वेंगुर्ले ६४५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २५. सक्रिय रुग्णांपैकी ३८६ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज ८५९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या २८ हजार ५७६, तर एकूण करोनाबाधितांची संख्या ३५ हजार ७२८ झाली आहे.

आज जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९०१ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड २, कणकवली २, मालवण २, वेंगुर्ले १, वैभववाडी १, सावंतवाडी १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १२७, दोडामार्ग – २६, कणकवली – १८१, कुडाळ – १३८, मालवण – १६२, सावंतवाडी – १३२, वैभववाडी – ६२, वेंगुर्ले – ६९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ४.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply