रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ जून) करोनाचे नवे ६२३ रुग्ण आढळले, तर २९२ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. नवबाधितांची संख्या आजही सहाशेहून अधिक झाली आहे. आज १६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ३३५, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २२६ (दोन्ही मिळून ५७८). आधीच्या तारखेनुसार १०३ रुग्णांची आज नोंद झाली. त्यांच्यासह आजच्या रुग्णांची संख्या ६२३ झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४५ हजार ९३६ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर १७.०५ टक्के आहे.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून पाच हजार १०८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज चार हजार ४७२ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख २३ हजार ४२१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज २९२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३९ हजार २६७ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८५.४८ टक्के आहे.
जिल्ह्यात कालच्या ८ आणि आजच्या ८ अशा १६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ५६१ झाली आहे. मृत्युदर ३.३९ टक्के आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४६२, खेड १५१, गुहागर १३७, दापोली १२४, चिपळूण ३००, संगमेश्वर १८०, लांजा ८२, राजापूर ११२, मंडणगड १३. (एकूण १५६१).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
