सिंधुदुर्गात नवबाधित आणि करोनामुक्तांची संख्या जवळजवळ सारखीच

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २६ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४०३ आणि एकूण ३३ हजार ८२६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज नवे ४१७ करोनाबाधित आढळले. त्यामुळे नवबाधित आणि बरे होऊन घरी गेलेल्या करोनाबाधितांची संख्या जवळजवळ सारखीच राहिली.

सध्या जिल्ह्यात ५ हजार २८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या ९ जणांसह ४१७ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४४, दोडामार्ग – १३, कणकवली – १२२, कुडाळ – ५६, मालवण – ५०, सावंतवाडी – ६०, वैभववाडी – ४, वेंगुर्ले – ५७. एकूण करोनाबाधितांची संख्या ४० हजार १३१ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६७०, दोडामार्ग १८६, कणकवली १०७५, कुडाळ ११८६, मालवण ७३५, सावंतवाडी ६०१, वैभववाडी २५५, वेंगुर्ले ५५६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १९. सक्रिय रुग्णांपैकी २८१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०२० झाली आहे. आज नोंद झालेल्या ७ मृतांसह इतर ८ मृतांचा तपशील असा – देवगड ३, कणकवली १, कुडाळ ४, मालवण ५, वेंगुर्ले २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३४, दोडामार्ग – ३१, कणकवली – २०७, कुडाळ – १५६, मालवण – १९९, सावंतवाडी – १४२, वैभववाडी – ६८, वेंगुर्ले – ७७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply