रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी करोनामुक्त झालेल्यांचा उच्चांक

नवबाधित रुग्णांची संख्या अनेक दिवसांनी पाचशेहून कमी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ जून) एकाच दिवशी एक हजार ३२२ जण करोनामुक्त झाले असून एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याचा हा उच्चांक आहे. आज नव्या करोनाबाधितांची संख्याही अनेक दिवसांनी पाचशेच्या खाली आली. आज नवे ४८२ रुग्ण आढळले.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – १७६, अँटिजेन चाचणी – १७२ (एकूण ३४८). आधी नोंद न झालेल्या १३४ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ४८२ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६० हजार ४५ झाली आहे.

जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ६.७१ टक्के, तर एकूण रुग्णवाढीचा दर १४.६० टक्के आहे.
आज पाच हजार ६९३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज सहा हजार ७५ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ५१ हजार ३४९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज एक हजार ३२२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५२ हजार ६३१ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.७४ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ७२१ झाली आहे. मृत्युदर २.८७ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५६१, खेड १६५, गुहागर १३८, दापोली १४४, चिपळूण ३३६, संगमेश्वर १४९, लांजा ९१, राजापूर १०१, मंडणगड २२. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १७२१).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply