सिंधुदुर्गात करोनाचे नवे ३५५ रुग्ण, १५५ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २८ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १५५ आणि एकूण ३३ हजार ९८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज नवे ४१७ करोनाबाधित आढळले.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ४५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या १५ जणांसह ३५५ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १७, दोडामार्ग – १३, कणकवली – ६६, कुडाळ – ५८, मालवण – ७०, सावंतवाडी – ३७, वैभववाडी – १८, वेंगुर्ले – ५९, जिल्ह्याबाहेरील २. एकूण करोनाबाधितांची संख्या ४० हजार ४७१ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६८६, दोडामार्ग १९३, कणकवली १०३९, कुडाळ १२४३, मालवण ७९७, सावंतवाडी ६३६, वैभववाडी २६०, वेंगुर्ले ५८३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २१. सक्रिय रुग्णांपैकी २६८ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०३० झाली आहे. आज नोंद झालेल्या ७ मृतांसह इतर ३ मृतांचा तपशील असा – देवगड १, दोडामार्ग १, कणकवली १, मालवण ५, सावंतवाडी २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३५, दोडामार्ग – ३२, कणकवली – २०८, कुडाळ – १५६, मालवण – २०४, सावंतवाडी – १४४, वैभववाडी – ६८, वेंगुर्ले – ७७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply