सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४४ हजार ४८३

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंतच्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ४८३ झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत ३९ हजार ४९१ रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज, १० जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत २९९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दुबार तपासणी केलेल्या ३ जणांसह नवे २५४ करोनाबाधित रुग्ण आढळले.

सध्या जिल्ह्यात ३ हजार ८७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३६, दोडामार्ग – १३, कणकवली – २७, कुडाळ – ६५, मालवण – ३८, सावंतवाडी – २९, वैभववाडी – १६, वेंगुर्ले – २७.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६०६, दोडामार्ग १०५, कणकवली ५९६, कुडाळ ९३२, मालवण ६८८, सावंतवाडी ४४८, वैभववाडी १५१, वेंगुर्ले ३२६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २०. सक्रिय रुग्णांपैकी १८० रुग्ण ऑक्सिजनवर तर ४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.


आज जिल्ह्यात ८ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ११५ झाली आहे. आजच्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड २, कणकवली ३, कुडाळ २, वैभववाडी १, वेंगुर्ले १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १४८, दोडामार्ग – ३४, कणकवली – २२२, कुडाळ – १७१, मालवण – २३१, सावंतवाडी – १५०, वैभववाडी – ६९, वेंगुर्ले – ८४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply