रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांच्या संख्येत पुन्हा घट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१० जुलै) करोनामुक्तांच्या संख्येत आज पुन्हा घट नोंदविली गेली. मे महिन्यांपासूनच्या २७ मृतांची आज नोंद झाली.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – १२५, अँटिजेन चाचणी – ३४८ (एकूण ४७३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६६ हजार ४१ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ८.२७ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १३.४६ टक्के आहे.

आज चार हजार २८४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ८०१ गृह विलगीकरणात, दोन हजार ४८३ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ५६५ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज पाच हजार २४८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ३१ हजार ६९३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात ३९६ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५९ हजार ३०२ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८९.८० टक्के झाली आहे.

जिल्ह्यात २६ मे ते ८ जुलै या कालावधीतील २७ आणि आजचे ३ अशा ३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ८९० झाली आहे. मृत्युदर २.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६२२, खेड १७३, गुहागर १४०, दापोली १६६, चिपळूण ३६२, संगमेश्वर १७३, लांजा ९९, राजापूर ११४, मंडणगड २७. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १८९०).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply