सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधित, करोनामुक्तांचीही संख्या घटली

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्या करोनाबाधितांची आणि करोनामुक्तांचीही संख्या कालच्या तुलनेत घटली आहे.

आजपर्यंतच्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ७५३ झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत ३९ हजार ६२७ रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज, ११ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दुबार तपासणी केलेल्या ८ जणांसह नवे २७८ करोनाबाधित रुग्ण आढळले.

सध्या जिल्ह्यात ४ हजार १ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३९, दोडामार्ग – ७, कणकवली – ७०, कुडाळ – ५९, मालवण – २८, सावंतवाडी – २९, वैभववाडी – १५, वेंगुर्ले – २३.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६४०, दोडामार्ग १०४, कणकवली ६२९, कुडाळ ९४०, मालवण ७०१, सावंतवाडी ४७२, वैभववाडी १५७, वेंगुर्ले ३३८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २०. सक्रिय रुग्णांपैकी १९१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ५ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार १२३ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड २, कणकवली २, मालवण ३, वेंगुर्ले १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५०, दोडामार्ग – ३४, कणकवली – २२४, कुडाळ – १७१, मालवण – २३४, सावंतवाडी – १५०, वैभववाडी – ६९, वेंगुर्ले – ८५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply