सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही नव्या करोनाबाधितांची आणि करोनामुक्तांचीही संख्या घटली आहे. आज करोनाचे नवे २५५ रुग्ण आढळले. आजपर्यंतच्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४५ हजार ५ झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत ३९ हजार ७४५ रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आज, १२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ११८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दुबार तपासणी केलेल्या ३ जणांसह नवे २५५ करोनाबाधित रुग्ण आढळले.
सध्या जिल्ह्यात ४ हजार १२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ५२, दोडामार्ग – ११, कणकवली – ४८, कुडाळ – ५६, मालवण – ४२, सावंतवाडी – १९, वैभववाडी – २, वेंगुर्ले – २१, जिल्ह्याबाहेरील १.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६९२, दोडामार्ग १०७, कणकवली ५९५, कुडाळ ९९२, मालवण ७३२, सावंतवाडी ४८९, वैभववाडी १४४, वेंगुर्ले ३५४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २१. सक्रिय रुग्णांपैकी १८५ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात ७ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार १३२ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड १, कणकवली ४, मालवण १, सावंतवाडी २, वेंगुर्ले १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५१, दोडामार्ग – ३४, कणकवली – २२८, कुडाळ – १७१, मालवण – २३५, सावंतवाडी – १५२, वैभववाडी – ६९, वेंगुर्ले – ८६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
