रत्नागिरी जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ जुलै) सलग दुसऱ्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे.

आज ३३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ९१.१७ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर २१५, अँटिजेन चाचणी ८३ (एकूण २९८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६६ हजार ८०८ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.८६ असून एकूण रुग्णवाढीचा दर १३.३६ टक्के आहे.

आज तीन चार हजार ६६५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ६२४ गृह विलगीकरणात, दोन हजार ३१ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ३३९ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.

आज तीन हजार ४९१ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ४० हजार २०५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात ३३९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ६० हजार ९०९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९१.१७ टक्के झाली आहे.

जिल्ह्यात आज ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९०५ झाली आहे. मृत्युदर किंचित घटून तो २.८५ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६२७, खेड १७४, गुहागर १४१, दापोली १६७, चिपळूण ३६६, संगमेश्वर १७४, लांजा ९९, राजापूर ११६, मंडणगड २७. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १९०५).
…….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply