सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या स्थितीत दिलासादायक सुधारणा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१९ जुलै) करोनाच्या स्थितीत दिलासादायक सुधारणा झाली आहे. रुग्णसंख्या आणि मृतांची संख्याही घटली आहे.

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे ४९ रुग्ण करोनामुक्त झाले असून करोनामुक्तांची एकूण संख्या ४१ हजार ८८७ झाली आहे.

आज जिल्ह्यात दुबार तपासणी केलेल्या १२ जणांसह नवे १८४ करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४६ हजार ३७० झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ३ हजार ३१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २२, दोडामार्ग – ४, कणकवली – २३, कुडाळ – ३७, मालवण – २६, सावंतवाडी – २८, वैभववाडी – १३, वेंगुर्ले – १९.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४६४, दोडामार्ग ८९, कणकवली ६३२, कुडाळ ७८१, मालवण ५३५, सावंतवाडी ४१०, वैभववाडी १३३, वेंगुर्ले २४९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १७. सक्रिय रुग्णांपैकी १८१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात आधीच्या २ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार १७१ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – मालवण १, कुडाळ १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५३, दोडामार्ग – ३४, कणकवली – २३५, कुडाळ – १७८, मालवण – २४२, सावंतवाडी – १५९, वैभववाडी – ७०, वेंगुर्ले – ९४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply