सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनामुक्तांपेक्षा अडीचपट नवबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२१ जुलै) करोनामुक्त झालेल्यारुग्णांपेक्षा अडीच पट रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत.

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे ९१ रुग्ण करोनामुक्त झाले असून करोनामुक्तांची एकूण संख्या ४२ हजार ४५० झाली आहे.

आज जिल्ह्यात दुबार तपासणी केलेल्या ६ जणांसह नवे २२८ करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४६ हजार ७६४ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ३ हजार १२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३३, दोडामार्ग – ८, कणकवली – ३७, कुडाळ – ५२, मालवण – ३१, सावंतवाडी – ३३, वैभववाडी – ११, वेंगुर्ले – १५, जिल्ह्याबाहेरील २.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४०८, दोडामार्ग ९०, कणकवली ५९०, कुडाळ ७०१, मालवण ५५८, सावंतवाडी ३९४, वैभववाडी १३७, वेंगुर्ले २३१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १९. सक्रिय रुग्णांपैकी १७२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात आधीच्या ४ आणि आजच्या ३ अशा ७ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार १८४ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – कणकवली ३, मालवण १, सावंतवाडी १, वैभववाडी १, वेंगुर्ले १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५४, दोडामार्ग – ३४, कणकवली – २३९, कुडाळ – १८०, मालवण – २४४, सावंतवाडी – १६१, वैभववाडी – ७१, वेंगुर्ले – ९५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply