रत्नागिरी जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा चौपट रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ जुलै) करोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा चौपट रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज नवे १५६ रुग्ण आढळले, तर ६९४ रुग्ण करोनामुक्त झाले.


आतापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६४ हजार ५१५ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.३४ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – ११०, अँटिजेन – १२३ (एकूण २३३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६८ हजार ९५९ झाली आहे.

आज दोन हजार ६४४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ९९६, तर लक्षणे असलेले ६४८ रुग्ण आहेत. एक हजार १११ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ८२०, डीसीएचसीमधील ३७१, तर डीसीएचमध्ये २७७ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांपैकी २३१ जण ऑक्सिजनवर, ९७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला. आजचा मृत्युदर २.८५ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ९७३ झाली आहे.

आज आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या दोन हजार ८९७ नमुन्यांपैकी दोन हजार ८४० अहवाल निगेटिव्ह, तर ५७ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या चार हजार ८१७ पैकी चार हजार ७१८ अहवाल निगेटिव्ह, तर ९९ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ६० हजार ७२० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड २९, दापोली १७४, खेड १७७, गुहागर १४७, चिपळूण ३७८, संगमेश्वर १७८, रत्नागिरी ६५३, लांजा १०३, राजापूर १२०, इतर जिल्ह्यातील १३. दुबार मोजणी १. (एकूण १९७३).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply