सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा तिपटीहून अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२७ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १३५ नवे करोनाबाधित आढळले, तर तिपटीहून अधिक म्हणजे ४९४ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची एकूण संख्या ४३ हजार ७७८ झाली आहे.

आज एका दुबार तपासणीसह नवे १३५ करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४७ हजार ६५८ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २२, दोडामार्ग – २, कणकवली – २२, कुडाळ – ५१, मालवण – ११, सावंतवाडी – २०, वैभववाडी – ३, वेंगुर्ले – ३.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३१६, दोडामार्ग ७०, कणकवली ४७२, कुडाळ ६३९, मालवण ४७०, सावंतवाडी ३२९, वैभववाडी १६६, वेंगुर्ले १७२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १६. सक्रिय रुग्णांपैकी १५० रुग्ण ऑक्सिजनवर तर ३८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात कालच्या ४ आणि आजच्या ४ अशा आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २२७ झाली आहे. आजच्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – कणकवली ३, कुडाळ १, मालवण ४. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५७, दोडामार्ग – ३५, कणकवली – २५३, कुडाळ – १८७, मालवण – २५१, सावंतवाडी – १६९, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ७.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply